कर्डिले पिता-पुत्र : जनता दरबारातून नवी उर्जा, झेडपी निवडणुकीकडे लक्ष
अहिल्यानगर जिल्ह्यात आमदार शिवाजी कर्डिले हे सतत चर्चेत राहिलेले नाव. राजकीय तसेच सामाजिक प्रश्न असोत, त्यांच्या कोर्टात गेलेले विषय त्यांच्या स्टाईलने सोडवले जातात. बुऱ्हाणनगर येथील निवासस्थानी रोज भरत असलेल्या जनता दरबारामुळे नागरिकांना थेट संवाद साधण्याची संधी मिळते.
याच परंपरेत त्यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले यांनीही जनता दरबाराच्या माध्यमातून जनतेचा विश्वास जिंकला आहे.
"जनता दरबारातून उभा राहिलेला नवा अध्याय – कर्डिले पिता-पुत्रांची राजकीय जोडी"
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कर्डिले पिता-पुत्र
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीनंतर कर्डिले पिता-पुत्र शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले.
- शेतकऱ्यांच्या बांधावर जावून प्रत्यक्ष दिलासा दिला.
- पंचनामे तातडीने करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.
- दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई मिळेल असे ठोस आश्वासन दिले.
- जिल्ह्याच्या पाहणी दौर्यात मुख्यमंत्री व मंत्र्यांसोबत सक्रिय सहभाग घेतला.
राजकीय समीकरणे आणि आगामी निवडणुका
आगामी जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये कर्डिले कुटुंबाची भूमिका चर्चेत आहे.
- भाजप व महायुतीकडून निवडणुका लढवण्याचे संकेत मिळाले आहेत.
- अक्षय कर्डिले जेऊर गटातून मैदानात उतरण्याची चर्चा रंगली आहे.
- स्थानिक पातळीवर भाजपला मोठा आधार असून कर्डिले कुटुंबाची पकड मजबूत आहे.
- शिवाजी कर्डिले आजारी असूनही जनतेत कार्यरत राहिले, त्यांची परंपरा अक्षय कर्डिले चालवतील का याकडे लक्ष आहे.
जनतेला ‘अक्षय’ उर्जा
शिवाजी कर्डिले यांच्या तब्येतीमुळे राजकीय समीकरणात अनिश्चितता असली तरी त्यांच्या चिरंजीव अक्षय कर्डिले यांनी ती पोकळी भरून काढली. दररोजच्या जनता दरबारातून नागरिकांना न्याय मिळाला, समस्यांचे निराकरण झाले. त्यामुळे आता जनतेत “शिवाजी कर्डिले यांच्यानंतर जनतेला अक्षय उर्जा मिळत आहे” अशी प्रतिक्रिया ऐकायला मिळते.
आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत अक्षय कर्डिले कोणत्या गटातून उतरतील, आणि ते जनतेच्या अपेक्षा पूर्ण करू शकतील का? 💬 तुमचं काय मत आहे? कमेंटमध्ये नक्की कळवा.

No comments
Post a Comment